
Ladki bahin yojana च्या द्वारे विवाहित, अविवाहित, विधवा अशा महिलांना प्रति महिना 1500 रुपये प्राप्त होतात. आणि अजून पर्यंत महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या माध्यमातून महिलांना 13500 रुपये DBT च्या स्वरूपात बँक खात्यात जमा केले गेले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पात्र झालेल्या महिलांचे अर्ज पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज हे नामंजूर करण्यात आले आहेत. त्यांना अपात्र करण्यात आले आहेत अशा महिलांना Ladki bahin Yojana 10th hafta मिळणार नाही.
जर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता केव्हा भेटणार याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या पोस्टला शेवटपर्यंत वाचा.
Ladki bahin yojana April 10th installment
| योजनेचे नाव | लाडकी बहिण योजना |
|---|---|
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| योजनेचे उद्देश | महिलांना आर्थिक मदत करणे आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणे |
| वय मर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| मिळणारे मोबदला | 1500 रुपये प्रति महिना |
| आवेदन प्रक्रिया | ऑफलाइन / ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाईट |
महाराष्ट्र शासनाने Ladki bahin yojana च्या माध्यमाने आतापर्यंत महिलांना 9 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेच्या द्वारे महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले आहेत. महिलांना या योजनेच्या द्वारे एकूण 13500 रुपये देण्यात आले.
आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता देण्यास सुरू करणार आहेत. पात्र महिलांना 1500 रुपये आपल्या बँक खात्यात जमा करणार आहेत.
लाडकी बहिण योजनेच्या एप्रिलचा दहावा हप्त्यासाठी लागणारे पात्रता.
मुख्यमंत्री majhi Ladki bahin Yojana च्या एप्रिल महिन्याचे पैशाचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू केल्या आहेत. त्या अटी पूर्ण केल्यावरच एप्रिल चा 10th installment मिळेल आणि या अटी अनिवार्य आहेत. म्हणून या अटींचा उल्लंघन करता येणार नाही. ज्या महिला या अटी आणि नियमानुसार पात्र ठरत नाही त्या महिलांना April 10th installment मिळणार नाही.
1. महिलांचा अर्ज हा वेबसाईट मध्ये approved झालेला हवा .
2. लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
3. लाभार्थी चे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे .
4. महिलेचे वय हे 21 ते 65 वर्ष मध्ये असणे.
5. लाभार्थी महिलांचा बँक खाता आधारकार्डशी लिंक असला पाहिजे .
6. महिला ही कोणत्याही दुसऱ्या योजनेची लाभार्थी नसावी .
7. लाभार्थीच्या घरी चार चाकी गाडी नसावी .
लाडकी बहीण योजना एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची तारीख
महाराष्ट्र सरकारने एप्रिलचा दहावा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता हा 20 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येण्याची संभावना आहे.
एप्रिलच्या दहाव्या हप्त्यामध्ये महिलांना मिळणार 3000 रुपये .
महाराष्ट्र सरकारच्या DBT प्रणाली मध्ये काही खराबी आली होती. त्यामुळे काही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात मिळाला. दोन महिन्याचे हप्ते एक साथ मिळाले. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना फक्त एकाच महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशा महिलांना एप्रिलच्या दहाव्या हप्त्यात मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे 3000 रुपये एक साथ देण्यात येतील.
या महिलांना एप्रिलचा दहावा हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Ladki bahin yojana ची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तपासणी मध्ये ज्या महिला पात्र ठरणार नाहीत अशा महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात येतील. यामध्ये काही महिलांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे. परंतु आता ज्या महिला या योजनेच्या अटीनुसार पात्र होणार त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.