Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचे अर्ज झाले बाद? आता मिळणार फक्त 500 रुपये महिना | जाणून घ्या सविस्तर माहिती

 



Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये महिना मानधन दिले जाते. या योजनेला राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी प्रतिसाद दिला. Ladki bahin yojana सुरू करण्याचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक मदत व्हावी याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या अंतर्गत महिलांना आतापर्यंत 13500 रुपये 9 हफ्त्याच्या स्वरूपात दिले. या योजनेच्या द्वारे विवाहित, अविवाहित, विधवा अशा गरजू महिलांना 1500 रुपये महिना म्हणून मानधन वितरण केले गेले. आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत 2.5 कोटी पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

लाडकी बहिणीवर होणार कारवाई?|ladki bahin yojana new update


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Ladki bahin yojana मध्ये पात्र झालेल्या महिलांचे अर्जाची पुनर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या अटीमध्ये काही महिला बसत नाही म्हणून अशा महिलांना अपात्र ठरवून त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा ही सुरू करण्यात आली तेव्हा शासनाने काही अटी/निकष ठेवलेल्या होत्या. याच अटी मुळे काही महिला या योजनेत बसत नाही परंतु तरी सुद्धा लाडकी बहिण योजना चा लाभ घेत आहेत. अशा महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही आणि त्यांना पुढचा हप्ता भेटणार नाही.


लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार तपासणी| ladki bahin yojana status 


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये आता पुनर तपासणी होणार या योजनेच्या अर्जाची तपासणी ही पाच टप्प्यात केले जाणार आहे. आणि प्रत्येक टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या निकषांची तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांच्या नावे चार चाकी गाडी आहे अशा महिलांची यादी ही RTO मधून घेतली जाणार आहे. आणि ज्या महिलांच्या नावावर गाडी आहे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत.

 तसेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून बात करण्यात येईल. तसेच ज्या महिला सरकारी नोकरी करतात अशा महिलांची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. अशा सर्व प्रकारची तपासणी केली जाणार. ज्या महिला पडताळणी मध्ये बसत नाही अशा महिलांचे अर्ज नामंजूर करून त्यांना या योजनेतून बाद केले जाणार.


या महिलांना मिळणार फक्त 500 ₹ हप्ता| ladki bahin yojana hafta



लाडकी बहीण योजनांमध्ये अशा काही महिला आहेत. ज्या नमो शेतकरी योजनाचा लाभ घेतात. नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना 1000 ₹ महिना सन्मान निधी प्राप्त होतो. Namo  shetkari yojana आणि Ladki bahin yojana या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 500 रु महिना मिळणार आहे. अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती ठाकरे यांनी दिली. 


नमो शेतकरी योजना मध्ये पात्र असलेल्या महिलांना 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र असलेला महिलांना 1500 रुपये महिना दिला जातो. अशा अनेक महिला आहेत ज्या दोन्ही योजनांचा लाभ घेतात. यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे आता 500 रुपये महिना मिळणार आहे.

दिनांक 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या mukhymantri majhi Ladki Bahin Yojana मध्ये शासन निर्णयानुसार जी महिला इतर शासकीय योजनांचा लाभ घेते अशा महिलांना 500 रुपये महिना देण्यात येणार आहे अशी माहिती अदिती ठाकरे यांनी दिलेली आहे. 

नोट: ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेचा 500 रुपये महिना मिळणार. परंतु त्यांना या योजनेतून बाद करणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी.


एप्रिल महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार|ladki bahin yojana installment date 


एप्रिल महिन्याचा हप्ता हा 30 एप्रिल पर्यंत येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता तेव्हाच भेटेल जेव्हा बँक खाता हा आधार कार्डशी लिंक असेल. तेव्हा त्वरित बँक खाता आधार कार्डशी लिंक करून घ्यावे. काही महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.